Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे युवकांना आवाहन –...

डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे युवकांना आवाहन – राजदूत विशाल शर्मा

मुंबई, दि. १९ : अजय मगरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन हे शिक्षण, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन युवकांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी केले.

दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राजदूत शर्मा प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षणाच्या बळावरच बाबासाहेबांनी सामाजिक अन्याय, विषमता व भेदभावाविरोधात लढा दिला. त्यांची चिकाटी, बुद्धिमत्ता आणि ज्ञानसाधना आजच्या युवकांसाठी दिशादर्शक ठरते.

राजदूत शर्मा म्हणाले, जात, धर्म व पंथाच्या बंधनांपलीकडे जाऊन शिक्षण घेण्याचा संदेश बाबासाहेबांनी समाजाला दिला. आजच्या स्पर्धात्मक काळात युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून बौद्धिक विकास व कर्तृत्वनिर्मितीवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने त्यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार होत असून ही घटना देशासाठी गौरवास्पद असल्याचेही राजदूत शर्मा यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!