Homeताज्या बातम्यान्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी घेतली ५२व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी घेतली ५२व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

नवी दिल्ली,दि.१४ ( प्रतिनिधी )

भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना व इतर मान्यवर उपस्थित होते.

न्यायमूर्ती गवई यांनी निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडून पदभार स्वीकारला. खन्ना यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपला होता.अमरावती (महाराष्ट्र) येथे २४ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेले न्यायमूर्ती गवई हे आंबेडकरवादी विचारसरणीचे असून, माजी खासदार आणि राज्यपाल राहिलेले रा.सु. गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी १९८५ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. एल.एल.बी. पूर्ण केले आणि १९८७ मध्ये वकिलीला सुरुवात केली. न्यायालयीन सेवेत त्यांनी सहाय्यक सरकारी वकील, अतिरिक्त लोक अभियोजक, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली.

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतेनुसार त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रपतींनी २९ एप्रिल रोजी त्याला मंजुरी दिली होती. त्यांचा कार्यकाल २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होईपर्यंत सहा महिन्यांचा असेल.न्यायमूर्ती गवई यांनी आजवर ७०० हून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला असून ३०० पेक्षा अधिक निर्णयांचे लेखन केले आहे. त्यांच्या निर्णयांमध्ये संविधानिक, नागरी, फौजदारी, प्रशासकीय आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!