Homeताज्या बातम्यापैठणमध्ये सामाजिक कार्यकर्ते अतिश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला;

पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्ते अतिश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला;

रविवारी पैठण बंदची हाक…!

पैठण, दि. २८ (प्रतिनिधी)

येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अतिश गायकवाड यांच्यावर मंगळवारी (दि. २७ मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोर्ट रोडवरील हुतात्मा स्मारकाच्या मागे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.

लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

हल्ल्याच्या वेळी परिसरात अंधार आणि पावसाचे वातावरण असल्यामुळे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष व उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ताभाऊ गोर्डे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि गायकवाड यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले.

या भीषण हल्ल्यामुळे पैठण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, साईनाथ कर्डिले, किशोर सदावर्ते, किशोर शिरवत, शुभम गायकवाड यांच्यासह अनेकांनी जोरदार निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

या घटनेचा निषेध म्हणून रविवारी ( ता.१ जून) रोजी पैठण शहर बंद चे आवाहन पैठण तालुक्यातील सर्व राजकीय व सामाजिक संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!