Homeताज्या बातम्याबुद्ध पौर्णिमा निमित्त कोपरगाव शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन...

बुद्ध पौर्णिमा निमित्त कोपरगाव शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव, दि १० मे ( दिलीप गायकवाड )

कोपरगांव शहरातील धम्मदिप बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा निमित्त भव्य व धम्म मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन, सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भिक्खू अमृतानंद बोधी (थेरो), भिक्खू आनंद सुमनसिरी (थेरो), भिक्खू कश्यपजी आणि भिक्खू भारद्वाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहणाने होणार असून, त्यानंतर सकाळी ९:३० वाजता बुद्ध, धम्म आणि संघ वंदना तसेच सुत्तपठन होईल.या दिवशी कोपरगाव शहरातून बुद्ध मूर्तीची मंगल मैत्री रॅली (मिरवणूक) अश्वरथा मार्गे काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सायंकाळी ६:३० वाजता सुरू होऊन रात्री ८:१५ वाजता संपेल.

यानंतर आदरणीय भिक्खू संघ यांची धम्म देशना आयोजित करण्यात आली आहे.कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ९:१५ वाजता स्नेहभोजनाने होईल.

हा कार्यक्रम धम्मदिप बुद्ध विहार, मार्केट यार्ड रोड, कोपरगाव येथे पार पडणार असून, भारतीय बौद्ध महासभा, माता रमाई महिला मंडळ, समता सैनिक दल, धम्ममंगलज्ञान बुद्धिस्ट फाउंडेशन सह अन्य बहुजन बौद्ध उपासक-उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांनी या धम्म व सामाजिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!