Homeताज्या बातम्यामुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी ' बुधवारी ' वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा; 

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी ‘ बुधवारी ‘ वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा; 

सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि.१२ : अजय मगरे

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) वर्षानुवर्षे रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले असून, स्थलांतरानंतर मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे १३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता वांद्रे(पूर्व) येथील एसआरए कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे आणि महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी करणार आहेत. ३५ पेक्षा अधिक एसआरए प्रकल्पग्रस्त संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत एसआरए पीडितांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मदत मागितली होती. नागरिकांच्या मते, आजवर कुठल्याही राजकीय पक्षाने या प्रश्नासाठी ठोस लढा दिला नसून, हा लढा फक्त वंचित बहुजन आघाडी लढू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

मुख्य मागण्या : रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.

भाडे थकबाकीची तात्काळ भरपाई करावी.

गैरवर्तन करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी.

झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे.

एसआरए प्राधिकरणाने प्रकल्पांची प्रगती स्पष्टपणे जाहीर करावी.

बिल्डर-अधिकारी मिलीभगतीला आळा घालावा.

आवश्यक असल्यास शासनाने प्रकल्प ताब्यात घ्यावेत.

वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “एसआरए प्रकल्पग्रस्त हे प्रामुख्याने गरीब, शोषित आणि वंचित समाजातील असून, त्यांच्याशी होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!