Homeताज्या बातम्यामुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रांची स्थापना; 

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रांची स्थापना; 

महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून राज्यात तीन ठिकाणी – मुंबई, पुणे आणि नागपूर – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.

मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञान क्षेत्रासाठी आणि नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा उद्देश शासकीय सेवा अधिक प्रभावी, गतिमान व नागरिकाभिमुख बनवणे आहे. या केंद्रांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता, हायब्रिड क्लाऊड, डेटा अ‍ॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा करण्यात येणार आहे.

या कराराच्या अंतर्गत विकसित होणाऱ्या एआय मॉडेल्सवर मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असून, शासनाचे तंत्रज्ञानावर पूर्ण नियंत्रण राहणार आहे. जनरेटिव्ह एआयच्या वापरामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक, आधुनिक व अंदाजाधारित बनतील. नागरिकांसाठी ओळख व्यवस्थापन व सुरक्षित प्रवेश प्रणालीवरही विशेष भर दिला जाणार आहे.

शासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांना आयबीएमच्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, MSME व उद्योग क्षेत्राला AI व ऑटोमेशनच्या दिशेने प्रेरित करण्यात येणार आहे.

या सामंजस्य कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि आयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!