Homeताज्या बातम्यावागळे इस्टेट पोलिसांची दबंग कारवाई; पिस्तूलधारी तरुण ताब्यात

वागळे इस्टेट पोलिसांची दबंग कारवाई; पिस्तूलधारी तरुण ताब्यात

ठाणे | प्रतिनिधी : अजय मगरे

वागळे इस्टेट परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

रविवारी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे पथक गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक जे. ए. भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली. सुर्वेवाडी, नाल्याजवळ, तीन हात नाका परिसरात एक इसम अग्नीशस्त्रासह संशयास्पदरीत्या उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला.

एका चारचाकी वाहनाच्या बाजूला उभ्या असलेल्या संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव दिपक मंगलप्रसाद कुमार (वय २०, रा. फतेपूर, उत्तर प्रदेश) असे सांगितले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेच्या मागील बाजूस स्टील पॉलिश असलेले एक पिस्तूल (अंदाजे किंमत ₹५०,०००) तसेच २ जिवंत काडतुसे (अंदाजे किंमत ₹४,०००) असा एकूण ₹५४,००० किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला.

सदर तरुणाला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम भोसले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम व सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत, पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर ज्योतीराम भोसले पोलीस हवालदार वाळुंज पोलीस नाईक छोटू दाभाडे पोलीस हवालदार संतोष मगरे पोलीस हवालदार भोये पोलीस हवालदार सुनील वाघमारे तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही यशस्वी काम गिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी तिथे पोहोचत आहे, मला फक्त माझा स्वतःचा वेळ हवा आहे: मानस धामणे |...

पुणे: अव्वल दर्जाच्या टेनिसची गोडी लागलेल्या मानस धामणेला वाटते की तो फार मागे नाही आणि त्याने यश मिळवणे ही काळाची गरज आहे.कझाकस्तानमधील...

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

error: Content is protected !!