Homeताज्या बातम्याशिवसेना–रिपब्लिकन सेनेची युती : ‘विचार, विश्वास आणि विकास’ हे त्रिसूत्री लक्ष्य

शिवसेना–रिपब्लिकन सेनेची युती : ‘विचार, विश्वास आणि विकास’ हे त्रिसूत्री लक्ष्य

मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी

राज्यात सामाजिक न्याय, समता आणि विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन सेना यांनी आज औपचारिक युतीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात ही घोषणा करण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

युतीची घोषणा करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालते, तर दुसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा. आजपर्यंत ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केलं; आता ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करतो. संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करत राहू.”

ते पुढे म्हणाले, “सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी व्हायला हवा. विचार, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करायचे आहे. शिवशक्ती–भीमशक्तीची ही युती कार्यकर्त्यांचीच युती आहे, त्यामुळे नक्कीच यशस्वी होईल.”

यावेळी विरोधकांवर टीका करत शिंदे म्हणाले, “संविधान कधीच धोक्यात नव्हते, मात्र विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार केला. आता त्यांचंच अस्तित्व धोक्यात आलं आहे. जोवर सूर्य–चंद्र आहेत, तोवर डॉ. बाबासाहेबांचं संविधान कायम राहील.” तसेच, इंदू मिल येथे “जगाला हेवा वाटेल असं भव्य स्मारक उभं राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले, “या युतीमुळे राज्यात सामाजिक व राजकीय बदल घडतील. शिंदे यांनी आधीच वर्षावास कार्यक्रम घेऊन आंबेडकरी समाजाला सन्मान दिला, आता कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेतील, अशी खात्री आहे.”

युतीनंतर दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन राज्यभर विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!