विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर व सामाजिक सजगतेचा जागर निर्माण…
पैठण, दि. ७ : अभिजित सोनवणे
दावरवाडी येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात “सक्षम तू” या पोलीस जनजागृती अभियानाअंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी आयोजित या उपक्रमात पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना कायदा, सुरक्षितता व सोशल मीडियाच्या जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले.

पंडित सरांनी सायबर गुन्हे, शालेय हिंसाचार, रॅगिंग, मोबाईल आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, तसेच विद्यार्थी सुरक्षा यासंदर्भातील महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जाणीव, आत्मविश्वास व सामाजिक भान वाढीस लागले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामदादा तांगडेसह विविध मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य विभागाचे अधिकारी, पत्रकार, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये राजेंद्र वाघमोडे सर, प्रा. संदीप काळे सर, डॉ. प्रतिक्षा गावंडे, डॉ. बाळासाहेब दुधे, केंद्रप्रमुख राम तांगडे, पोलीस पाटील एकनाथ काशिद, मुख्याध्यापक सुदाम गोजरे, पर्यवेक्षक दत्तात्रय हजारे आदींचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला.




















