Homeताज्या बातम्यावीरभद्र नदी खोलीकरणाने दिला आशेचा किरण; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वीरभद्र नदी खोलीकरणाने दिला आशेचा किरण; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पैठण, दि.७. ( अभिजीत सोनवणे )

जि. छत्रपती संभाजीनगर – पैठण तालुक्यातील क्रमांक दोन असलेल्या वीरभद्र नदीचे खोलीकरण काही दिवसांपूर्वी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झाले होते. काल या भागात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात नदीचे पात्र तुडुंब भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

या कामामुळे निश्चितच परिसरातील भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतीचे संपूर्ण अर्थकारण पाण्यावर अवलंबून असल्याने, रब्बी हंगामातही पिके घेता येतील आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळण्यास मदत होईल. तसेच, काही भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या उपक्रमामागे श्री. किशोर तांगडे पाटील या भागातील तरुण कार्यकर्त्याचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी कुटुंबातून येणारे व या भागाच्या गरजा समजून घेणारे किशोर तांगडे यांनी नाम फाउंडेशनसोबत सातत्याने संपर्क ठेवत, शासनाच्या संबंधित विभागाशी पाठपुरावा करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे हे खोलीकरणाचे काम मंजूर होऊन प्रत्यक्षात अंमलात आणले गेले.

काम सुरू झाल्यानंतर देखील त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन ते वेळेत पूर्णत्वास नेले. स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीयांनीही या उपक्रमात सहकार्य केले. सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या मनात कामाबाबत शंका होत्या, परंतु किशोर तांगडे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेत त्या दूर करून लोकांचा विश्वास संपादन केला.

नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणून त्यांच्या कामाची प्रशंसा होत असून, परिसरातील नागरिकांनी याच धर्तीवर इतर गावांमध्येही अशी कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया – किशोर तांगडे पाटील (समन्वयक, नाम फाउंडेशन)

“नाम फाउंडेशनच्या समन्वयक या नात्याने मला जी जबाबदारी दिली होती, ती मी माझ्या सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवाराच्या सहकार्याने पूर्ण केली. पुढील काळात इतर भागांमध्येही अशा स्वरूपाची कामे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!