Homeताज्या बातम्याकोपरगावात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात संयुक्त आंदोलन

कोपरगावात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात संयुक्त आंदोलन

कोपरगाव, दि.९ : दिलीप गायकवाड

महाराष्ट्र राज्यात पारित करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्यांच्या हक्कांवर गदा आणणारा ‘काळा कायदा’ असल्याचा आरोप करत कोपरगाव तालुका काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समविचारी पक्ष व विविध संघटनांनी आज संयुक्तपणे आंदोलन छेडले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा जनतेतून तीव्र आंदोलनाची लाट उसळेल, असा इशारा दिला. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन सरकारविरोधी घोषणा दिल्या व तहसीलदारांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, हा कायदा जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना बाधा पोहोचवणारा आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हा कायदा मागे घ्यावा, अन्यथा जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी व्यापक चळवळ उभारली जाईल.

आंदोलनादरम्यान काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि उत्स्फूर्त सहभागामुळे तहसील कार्यालय परिसरात एकच घोषणाबाजी सुरू होती.

यावेळी विविध नेत्यांनी सरकारचा निषेध नोंदवून जनतेच्या हितासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

काॅग्रेस कोपरगांव तालुका अध्यक्ष नितीन शिंदे ॲड.संदीप वर्पै रा.का .पा.(शरद पवार,), राजाभाऊ झावरे (उबाटा), विजय जाधव (काॅ.सै.उपाध्यक्ष), सनी वाघ शिवसेना उ.बा.ठा शहर प्रमुख, बापुसते रांघवणे, किरण खर्डे, रमेश गव्हाणे, बालाजी गोर्डे, कालविंदर उडियाल, दिनेश पवार, मुकुंद सिंनगर, ऋतुराज काळे, सुरेश आसणे, निखिल थोरात,

इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!