Homeताज्या बातम्यादारू वाहतूक ट्रकवरच चोरट्यांचा डल्ला; दोन लाखांचा माल गायब! कोपरगावात रात्रीत...

दारू वाहतूक ट्रकवरच चोरट्यांचा डल्ला; दोन लाखांचा माल गायब! कोपरगावात रात्रीत खेळ चाले 

कोपरगाव, दि.१० : दिपक साटोटे

कोपरगाव शहरातील बालाजी आंगण परिसरात उभ्या असलेल्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकची ताडपत्री फाडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ४ हजार ३६० रुपयांचा देशी दारूचा माल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे

तक्रारदार महेश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते चालक म्हणून कार्यरत असून मालवाहक ६ टायर ट्रक क्र. एम.एच. ४१ जी ७१३५ ही गाडी ८ ऑक्टोबर रोजी त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर (कोळपेवाडी) येथून भिंगरी कंपनीचा देशी दारूचा माल भरला होता.

रात्री गाडी थांबवली; सकाळी उघड झाला चोरीचा प्रकार..

फिर्यादी मोरे यांनी सांगितले की, गाडीमध्ये १८० एम.एल.च्या बाटल्यांचे ४०० बॉक्स (बॅच नं. ११२१) आणि ९० एम.एल.च्या बाटल्यांचे २०० बॉक्स (बॅच नं. ११२८) असा माल भरला होता. हा माल श्रीरामपूर येथे डिलिव्हरीसाठी नेण्यात येणार होता. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांनी रात्री गाडी बालाजी आंगण, कोपरगाव येथे रोडच्या कडेला उभी करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ६.०० वाजता ते पुन्हा गाडीकडे आले असता, मागील ताडपत्री उचकलेली दिसली. पाहणी केली असता, भिंगरी कंपनीच्या १८० एम.एल. क्षमतेच्या ६५ बॉक्स (३१२० बाटल्या) चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरीस गेलेल्या या मालाची एकूण किंमत २,०४,३६०/- इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी नॅशनल ट्रान्सपोर्टचे मालक शैलेश रावळ यांना बोलावून घटनेची माहिती दिली. नंतर पोलिसांत धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिस तपास सुरू

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकचे आवरण फाडून दारूच्या पेट्या चोरल्या असाव्यात.या घटनेमुळे दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी रोकडे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!