कोपरगाव, दि. ११ : दिलीप गायकवाड
कोपरगावातील साई सिटी येथे नुकताच कोपरगावकरांचा ‘लेओ दांडिया रास २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद ताच पार पडलेला ‘लेओ दांडिया रास २०२५’ हा सांस्कृतिक जल्लोष जबरदस्त यशस्वी ठरला. तब्बल २ हजार हून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संगीत, नृत्य आणि पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
हा कार्यक्रम लेओ लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि सखी सर्कल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले डीजे श्रेया देशमुख यांचा धमाकेदार परफॉर्मन्स — त्यांच्या तालावर संपूर्ण सभागृह थिरकले. अँकर शलाका हिने आपल्या आकर्षक शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मनाली जैन आणि अनुष्का शाह यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
गरबा आणि ड्रेपरी स्पर्धांतील सहभाग, आकर्षक वेशभूषा आणि प्रेक्षकांसाठी ठेवलेला लकी ड्रॉ या सर्व गोष्टींनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
एकूण १० बक्षीस श्रेणींमध्ये विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सुप्रसिद्ध रील स्टार दिव्यांका परदेशी हिने “बेस्ट प्री रील स्टार”चा प्रथम क्रमांक पटकावला.
सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि व्यवस्थापनाच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. या सोहळ्याने कोपरगावच्या उत्सवप्रियतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढविला.
या लेओ दांडियाचे प्रायोजक मंडळ :टायटल स्पॉन्सर: सुधन गोल्ड लोन,टिकिट पार्टनर: शेट्टी’स स्वास्तिक व्हेज ट्रीट
फूड पार्टनर: लोढा कॅटरर्स
एंट्री पार्टनर: मुथा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स,लकी ड्रॉ पार्टनर: डॉ. दीपाली’स डिव्हाईन डर्मा क्लिनिक होते
प्राईझ स्पॉन्सर्स डॉ. बर्गेपाटील’स ३२ पर्ल्स डेंटल अँड ऑर्थोडॉन्टिक केअर, साई कुबेर डेव्हलपर, नितीन भडकवडे सराफ, पाम पॅराडाइज, मोरसर सराफ, बँक ऑफ बडोदा, माउली उद्योग समूह, विमल फर्निचर, ओंकार सोलर पॉवर सिस्टीम्स, जे.डी. कन्स्ट्रक्शन होते.
संघटनात्मक पदाधिकारी :
लेओ क्लब ऑफ कोपरगाव
अध्यक्ष धीरज कराचीवाला,सचिव मानस नगर,
कोषाध्यक्ष सम्यक फुलफगार, तर लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष अक्षय गिर्मे,
सचिव संदीप रशिंकर,कोषाध्यक्ष अक्षय बोरा. लायन्स क्लब (महिला शाखा) अध्यक्षा अंजली थोरे,सचिव सोनाली गिर्मे,कोषाध्यक्ष सरिता चोप्रा
सखी सर्कल ग्रुप सदस्या स्वाती कोयटे, सिमरन खुबानी, शालिनी खुबानी या होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश थोले, संदीप कोयटे,डॉ. अभिजीत आचार्य, करण शाह, कुशल कोठारी, आदित्य गुजराथी, पृथ्वी शिंदे, हर्षल कृष्णाणी, हर्षल होडे, शुभम भडकवडे, इंद्रनेल आढाव, ओम सोनवणे, श्रीराम बागुल, ओम जाधव, विशाल मानोरे, वैभव भडकवडे, हिमांशू छाजेड, जय धडीवाल, अक्षद धाडीवाल, यश बंब आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या उत्सवाच्या माध्यमातून कोपरगावने पुन्हा एकदा सिद्ध केले की सांस्कृतिक रंगत आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर मिलाफ इथल्या लोकांच्या मनामनात नांदतो.




















