Homeताज्या बातम्या' शिवसेना ' शिर्डी लोकसभा समन्वयक पदी मुकुंद सिनगर...

‘ शिवसेना ‘ शिर्डी लोकसभा समन्वयक पदी मुकुंद सिनगर…

सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांच्यावरही जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी

– ठाकरे गटात नव्या जोशाने संघटनात्मक बदल

कोपरगाव : दि. १२ दिलीप गायकवाड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा समन्वयक पदी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक मुकुंद सिनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिर्डी, संगमनेर आणि कोपरगाव विधानसभांसाठी जिल्हाप्रमुखपदी सचिन कोते आणि अकोले, श्रीरामपूर व नेवासा विधानसभांसाठी जगदीश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या नियुक्त्या जिल्हा संपर्क नेते खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, सचिव विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. जिल्हाप्रमुख व संघटक रावसाहेब खेवरे आणि सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी जाहीर झाल्या. उत्तर नगर जिल्ह्यात नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संघटनात्मक जबाबदारी देऊन पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार यामागे आहे.

राजकीय वर्तुळात या बदलांकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला संघटनात्मक पुनर्रचनेचा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

बहुजन शक्ती न्यूज प्रतिनिधींशी बोलताना नव्याने नियुक्त झालेल्या समन्वयक मुकुंद सिनगर यांनी सांगितले की, “पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास आणि सर्वसामान्य शिवसैनिकांच्या बळावर आम्ही जिल्ह्याभर शिवसेनेचे संघटन बळकट करू. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन एकजुटीने काम करू.”

त्यांनी पुढे सांगितले की, पक्षात कुठलेही मतभेद नाहीत, आणि लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली रणनिती ठरवली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, तालुक्यातील शिवसेनेचे आजी-माजी उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!