कोपरगाव, दि.३० : दिलीप गायकवाड
सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणारे कोपरगावचे सुप्रसिद्ध रील स्टार राकेश गायकवाड यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने नुकताच पुणे येथील पत्रकार भवन, गांजवे चौक येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.
राकेश गायकवाड यांच्या रील्समधून समाजप्रबोधन, मनोरंजन तसेच युवकांना प्रेरणा देणाऱ्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सिने अभिनेत्री त्रिशा अहिरवार व नमिता पोसम यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना राकेश गायकवाड यांनी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी हा सन्मान नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली.


















