Homeताज्या बातम्याग्रामीण भाग अंधारात; महावितरणचा गलथान कारभार!

ग्रामीण भाग अंधारात; महावितरणचा गलथान कारभार!

कोपरगाव तालुक्यातील भारनियमन तातडीने बंद करा; शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांची मागणी

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण भारनियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागातील भारनियमन तातडीने बंद करून पूर्ण दाबाने आणि अखंडित वीजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांनी केली आहे.

वीज वितरण कंपनी आणि विद्युत नियामक आयोगाने ग्रामीण भागाला नियमानुसार अकरा तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र वारंवार वीज खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत.

विशेषतः रात्रीच्या वेळी वीज नसल्याने ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांवरील अंधार, दळणवळणातील अडचणी, पिठाच्या गिरण्या बंद राहणे तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर समस्यांचा विचार करून महावितरणने तातडीने भारनियमन बंद करून सुरळीत व पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरू करावा, अशी एकमुखी मागणी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!