महामानवांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार; परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती…..
ठाणे : अजय मगरे
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. समता, सामाजिक न्याय आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष अजय त्रिभुवन, उपाध्यक्ष साहिल गायकवाड, खजिनदार तुषार इंगळे, सचिव अंकुश त्रिभुवन, सचिव रोहित गुंडीवले तसेच बहुजन शक्तीचे सुशांत साबळे, सुशील शरणांगत, विशाल मोरे, सुनील मोरे, अंकुश पोटफोडे, सुरज मगरे, पवन सोनवणे, अनिकेत निर्मळ, शुभम वारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अंबिका नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित समाजप्रबोधनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा आणि सामाजिक ऐक्य व समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




















