कप्तान मलिक यांची ‘राष्ट्रवादी एकजूट कामगार संघ’च्या सहचिटणीस पदावर नियुक्ती
मुंबई, दि.१ ( प्रतिनिधी )
आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या औचित्याने, राष्ट्रवादी एकजूट कामगार संघाच्या सहचिटणीस पदावर अब्दुल रशीद (कप्तान) मलिक यांची नियुक्ती करण्यात आली. ही सन्मानाची जबाबदारी त्यांना संघाचे अध्यक्ष संतोष धुवाळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

ही नियुक्ती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या विशेष प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबळे व खजिनदार संजय तटकरे यांचीही उपस्थिती लाभली.
ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेले सहचिटणीस मलिक यांनी यावेळी संघटनेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि कामगारांच्या हक्कांसाठी कार्य करण्याची ग्वाही दिली.
“संघटनेच्या कार्याचा विस्तार, कामगारांच्या प्रश्नांची जाण, आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट राहील,” असे मलिक यांनी नमूद केले.




















