Homeताज्या बातम्याएका जागेसाठी चार जणींमध्ये चुरस; कविता क्षीरसागर यांच्या एन्ट्रीमुळे नवा ट्विस्ट

एका जागेसाठी चार जणींमध्ये चुरस; कविता क्षीरसागर यांच्या एन्ट्रीमुळे नवा ट्विस्ट

कोणाच्या गळ्यात पडणार वॉर्ड क्रमांक १७३ ची उमेदवारी?

मुंबई, दि. १८ : मंगेश म्हात्रे

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सायन-कोळीवाडा मतदारसंघातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. नेहमीच चर्चेत असलेला प्रतीक्षानगर परिसरातील वॉर्ड क्रमांक १७३ हा यंदा महिलांसाठी राखीव घोषित झाल्याने शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत उमेदवारीसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

या वॉर्डसाठी सुरुवातीपासूनच माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा रामदास कांबळे, सायन-कोळीवाडा विधानसभा संघटक दशरथ पवार यांच्या सून निकिता पवार तसेच स्थानिक शाखासंघटिका वैजयंती घाडगे यांची नावे चर्चेत होती. मात्र, ऐन वेळी शाखाप्रमुख सचिन क्षीरसागर यांनी पत्नी कविता क्षीरसागर यांच्यासाठी उमेदवारीची दावेदारी केल्याने राजकीय गणितांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सायन-कोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे सुन निकिता पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतल्याने आधीच चर्चा तापल्या होत्या. त्यातच माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी पत्नी पूजा कांबळे यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर वैजयंती घाडगे यांच्या इच्छुक सोबत कविता क्षीरसागर यांच्या एन्ट्रीमुळे स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.

पूजा कांबळे व निकिता पवार यांचे पारडे जड

सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा रामदास कांबळे यांच्या उमेदवारीसाठी विभागप्रमुख मंगेश सातमकर, तर निकिता पवार यांच्या उमेदवारीसाठी माजी खासदार राहुल शेवाळे प्रयत्नशील आहेत. मात्र घाडगे आणि कविता क्षीरसागर यांच्या दावेदारीमुळे पूजा कांबळे व निकिता पवार यांच्या मार्गातील आव्हाने वाढली आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती जरी झाली असली, तरी वॉर्ड १७३ नेमका कोणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिंदे गटातील अंतर्गत स्पर्धेमुळे ही निवडणूक अधिक रंगतदार ठरणार असून अखेर उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण: पाचही संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयीन कोठडी कायम

नाशिक:प्रतिनिधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत झालेला कथित छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील पाच मुख्य संशयितांच्या...

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

error: Content is protected !!