Homeताज्या बातम्यादिंडोशी पोलिसांची धडक कारवाई; बोगस रेशन कार्ड तयार करणारी टोळी जेरबंद

दिंडोशी पोलिसांची धडक कारवाई; बोगस रेशन कार्ड तयार करणारी टोळी जेरबंद

कारवाईत 7 आरोपी अटकेत, 343 बोगस रेशनकार्ड जप्त

मुंबई | प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्या टोळीवर दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 343 बनावट शिधापत्रिका, तसेच बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी गेल्या अनेक दिवसांपासून बनावट रेशन कार्ड तयार करून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकार करत होती. गुप्त माहितीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी छापा टाकत टोळीचा पर्दाफाश केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ९ लॅपटॉप, २ प्रिंटर, मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी गुन्हा क्र. 91/2026 दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीमध्ये रेशनिंग कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून संबंधितालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी बोगस रेशनकार्डचं आधारे बांगलादेशी नागरिकांना ओळखपत्र मिळवून देणे तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुजल दयाल (२९), राकेश सिंग (४३), दिनेश कुमार केसारवाणी (४०), एडवर्ड उर्फ सोनू डिसोजा (४३), मनी शंकर शर्मा (३९), बिपिन कुमार पांडे (४२) आणि वीरू गुप्ता (३१) अशी असून ते मूळ नेपाळचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच मुंबईत किती लोकांना बनावट रेशन कार्ड देण्यात आले याचा सखोल तपास दिंडोशी पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!