Homeताज्या बातम्याशाळेच्या वसतिगृह आवारातून दुचाकी चोरी; जेऊरकुंभारीत चिंतेचे वातावरण

शाळेच्या वसतिगृह आवारातून दुचाकी चोरी; जेऊरकुंभारीत चिंतेचे वातावरण

कोपरगांव : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी, हरिसन ब्रॅच चार (तीन चारी) नगर–मनमाड, शिर्डी बायपास महामार्गालगत नागरे वस्ती येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृह आवारातून दुचाकी चोरीची घटना घडली आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

शाळेचे कर्मचारी सुभाष शिवगीरी गोसावी (रा. संवत्सर) यांनी दोन महिन्यांपूर्वीच सुमारे ८१ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची डीएफ-डिलक्स (क्रमांक MH-17 DM 2523) ही नवी मोटारसायकल खरेदी केली होती. नेहमीप्रमाणे त्यांनी ती शाळेच्या वसतिगृह आवारात लावली होती. मात्र पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.

या प्रकरणी सुभाष गोसावी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती गोसावी यांनी दिली. शाळा व वसतिगृह परिसरात सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरीची घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, जेऊरकुंभारी गावात यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असल्याची माहिती नागरिकांनी दिली. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून गावात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गावातील बहुतांश रस्त्यांवर वीज दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. हरिसन ब्रॅच चारी परिसर, इरिगेशन बंगला ते संजय नगर मार्ग, गिरमे वस्ती व चव्हाण वस्ती येथील रस्त्यांवरही प्रकाशयोजना नसल्याने चोरट्यांना संधी मिळत असल्याची चर्चा आहे. रात्री घरगुती वीजपुरवठाही खंडित होत असल्याने वाहनांची ओळख पटविणे कठीण जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दोन महिन्यांपूर्वी घेतलेली नवी मोटारसायकल चोरीला गेल्याने गोसावी हताश झाले असून पोलिस प्रशासनाकडून दुचाकी लवकरात लवकर शोधून काढली जाईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!