Homeताज्या बातम्यामुंबई बँकेकडून 'एसआरए' योजनेत ‘स्वयं पुनर्विकास’ योजना राबविण्याची तयारी

मुंबई बँकेकडून ‘एसआरए’ योजनेत ‘स्वयं पुनर्विकास’ योजना राबविण्याची तयारी

मुंबई बँकेकडून ‘एसआरए’ योजनेत ‘स्वयं पुनर्विकास’ योजना राबविण्याची तयारी

मुंबई, दि. १७ : प्रतिनिधी

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए ) आता ‘स्वयं पुनर्विकास’ योजनाही राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (मुंबई बँक) या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, नुकतीच शुक्रवारी (दि. १६) एसआरए प्राधिकरणात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत झोपडीधारकांना त्यांच्या वस्त्यांचे पुनर्वसन स्वतःहून करण्यासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य पुरवण्याच्या प्रस्तावावर चर्चा यावेळी करण्यात आली.

मुंबई बँकेचे संचालक आणि आमदार प्रविण दरेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “मुंबई बँकेने यापूर्वी म्हाडाच्या काही रखडलेल्या प्रकल्पांना आर्थिक मदत करून ‘स्वयं पुनर्विकास’ योजना यशस्वीपणे राबवली आहे. या योजनेअंतर्गत चारकोप येथील श्वेतांबर सोसायटी पूर्ण झाली आहे. तसेच काही इमारतींचा पुनर्विकासाचे काम सुरु असून, त्यातील काही इमारती उभ्या राहिल्या आहेत. आता त्याच यशस्वी मॉडेलचा अवलंब एसआरए प्रकल्पांमध्येही झोपडीधारकांचे पुनर्वसन स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.”

या प्रस्तावानुसार,एसआरए क्षेत्रातील रहिवासी आता विकासकांची वाट न पाहता स्वतःच्या वस्तीचा पुनर्विकास स्वतः करू शकतील. यासाठी मुंबई बँक आर्थिक मदत आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. ही योजना अंमलात आल्यास, विकासकांच्या अडचणींमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.

या संदर्भात माहिती देताना एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले, “मुंबई बँकेने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील रहिवाशांसाठी ‘स्वयं पुनर्विकास’ योजना राबविण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असून, मंजुरीनंतर स्वयं पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी सुरू होईल.”

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर रखडलेले एसआरए प्रकल्प हे रहिवाशांसाठी दीर्घकाळ त्रासदायक ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई बँकेच्या पुढाकारामुळे नागरिकांना आपले हक्काचे घर स्वबळावर उभारण्याची नवी संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!