Homeताज्या बातम्यामास्टरलिस्टवरील घरांसाठी २७ जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

मास्टरलिस्टवरील घरांसाठी २७ जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

१५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत; म्हाडाचे आवाहन

मुंबई : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या आरआर बोर्डातर्फे बृहतसूची (मास्टरलिस्ट) वरील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पात्र रहिवासी अथवा त्यांच्या वारसदारांची पात्रता निश्चित करून सदनिका वितरणासाठी येत्या २७ जानेवारीपासून सकाळी १० वाजता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्जदारांना masterlist.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. उपकरप्राप्त जुन्या इमारती रिकाम्या करूनही पुनर्विकास अशक्य ठरलेल्या प्रकरणांतील मूळ भाडेकरू, तसेच पुनर्रचित इमारतींमध्ये सदनिका अपुऱ्या पडल्याने वंचित राहिलेले रहिवासी व त्यांचे वारसदार, जे सध्या संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अर्जासाठी www.mhada.gov.in

या संकेतस्थळावरील Citizen Corner मधील Application for Masterlist या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ई-मेल आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज भरून ‘सबमिट’ करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारांनी स्वतः प्रमाणित केलेली कागदपत्रे ३० दिवसांच्या आत म्हाडा मुख्यालय, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व) येथील कक्ष क्रमांक ३७२ (दुसरा मजला) येथे प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे. सुनावणीवेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक राहणार आहे.

पात्रतेबाबतचा निर्णय म्हाडा अधिनियम १९७६, विनियम १९८१ तसेच शासन व म्हाडाच्या नव्या धोरणांनुसार गुणवत्तेच्या आधारे घेतला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. अर्जदारांकडे वैध मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, रंगीत छायाचित्र, आधार कार्ड, व्हेकेशन नोटीस, जुन्या इमारतीच्या भाडेपावत्या, वीज देयक, संक्रमण शिबिरातील ताबा कागदपत्रे आदी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

दरम्यान, यापूर्वी बृहतसूची समितीने पात्र ठरविलेले तसेच आधीच ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करू नये, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वी ऑफलाईन अर्ज केला असून त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे, त्यांनी नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!