Homeताज्या बातम्यासायन प्रतिक्षानगर संक्रमण शिबिरातील धोकादायक चार इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सायन प्रतिक्षानगर संक्रमण शिबिरातील धोकादायक चार इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

म्हाडा उपाध्यक्ष जयस्वाल यांचे महत्त्वपूर्ण निर्देश; रहिवाशांची त्याच ठिकाणी स्थलांतर

मुंबई : मंगेश म्हात्रे

सायन प्रतिक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास धोकादायक ठरलेल्या चार इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार संबंधित इमारतींमधील भाडेकरू व रहिवाशांची प्रतिक्षा नगरातच पात्रतेनुसार स्थलांतर करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, प्रस्तावित विक्री घटकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या काही इमारतींचा प्रस्ताव रद्द करून त्या जागी संक्रमण सदनिकांच्या इमारती उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ४ संक्रमण इमारतींतील २६१ भाडेकरू/रहिवासी आणि ४ दुकानदारांसाठी तळ + २२ मजली अशा दोन इमारतींमध्ये एकूण ३२२ संक्रमण सदनिका उभारण्यात येणार आहेत.

संबंधित रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या संक्रमण इमारतींचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सायन प्रतिक्षानगर येथील संक्रमण इमारत क्रमांक ३६, ३७, ५३ व ५४ यांच्या खालून भूमिगत जलवाहिनी गेली असल्याने इमारतींना तडे जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई मंडळामार्फत आयआयटी मुंबई यांच्याकडून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षण अहवालात संबंधित चारही इमारतींचा पुनर्विकास करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली आहे.

या अहवालाच्या पार्श्वभूमीवर तसेच रहिवाशांच्या त्याच अभिन्यासात स्थलांतराच्या मागणीचा विचार करून पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विकसित इमारतींचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत, संबंधित इमारतींतील भाडेकरू व रहिवाशांना म्हाडाच्या धोरणानुसार भाडे देऊन तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून स्थलांतर करण्यास जयस्वाल यांनी मान्यता दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!