Homeताज्या बातम्या”घर तोडलं… पण न्याय मिळाला!”

”घर तोडलं… पण न्याय मिळाला!”

सायन प्रतीक्षा नगरमध्ये तोडक कारवाईनंतर म्हाडाचा मोठा निर्णय; ७ कुटुंबांना तात्काळ घराच्या चाव्या!

मुंबई -मंगेश म्हात्रे

सायन प्रतीक्षा नगर येथील म्हाडा संक्रमण शिबिरातील डी लाईन बैठ्या चाळीतील रहिवाशांवर मंगळवारी ७ एप्रिल २०२६ रोजी कोणतेही स्थलांतर न देता थेट तोडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला होता.

या पार्श्वभूमीवर बुधवारी ८ एप्रिल २०२६ प्रतीक्षा नगर मधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. बैठकीत रहिवाशांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीत महत्वाचा निर्णय घेत म्हाडा उपाध्यक्षांनी तात्काळ दिलासा देत आदेश दिले की, तोडलेल्या डी लाईनमधील सर्व पात्र रहिवाशांना लगेच घरे देण्यात यावीत.

त्यानुसार, घर तोडलेल्या ७ रहिवासी कुटुंबांना उद्या घराच्या चाव्या देऊन सायन प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.उर्वरित ३ रहिवाशांच्या कागदपत्रांची तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीला म्हाडा सह मुख्याधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे, मिळकत व्यवस्थापक संजय शिरसाट यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!