Homeताज्या बातम्याकोपरगावात ‘रॉकेल माफिया’चा हैदोस; लिटरमागे १३० ते १४० रुपये वसुली

कोपरगावात ‘रॉकेल माफिया’चा हैदोस; लिटरमागे १३० ते १४० रुपये वसुली

गॅस तुटवड्याचा फायदा घेत काळाबाजार; प्रशासनाकडून कारवाईची नागरिकांची मागणी

कोपरगाव, दि.९.( दिलीप गायकवाड )

कोपरगाव शहरात रॉकेल माफियांनी अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील काही ठिकाणी रॉकेल (केरोसिन) तब्बल १३० ते १४० रुपये प्रति लिटर दराने विकले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, मजूर आणि छोटे हॉटेल व्यावसायिक हैराण झाले असल्याचे समजून येते.

घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक छोटे हॉटेल व्यावसायिकांनी गॅसऐवजी स्टोव्हचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी वाढली असून या परिस्थितीचा फायदा घेत रॉकेल माफियांनी काळाबाजार सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मात्र सध्या शहरातील काही दुकानांमध्ये रॉकेल १३० ते १४० रुपये प्रति लिटर दराने विकले जात असल्याची कोपरगावात चर्चा आहे.

रॉकेलच्या वाढत्या दरामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी रॉकेलऐवजी डिझेलचा वापर सुरू केल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मजूर, कामगार आणि गरीब कुटुंबे अजूनही स्वयंपाकासाठी रॉकेलवर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

अमेरिका – इराण युद्धस्थितीचे कारण पुढे करून शहरात रॉकेल माफियांच्या माध्यमातून साठेबाजी व चढ्या भावाने विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून रॉकेल माफियांवर कडक कारवाई करावी आणि रॉकेलचे दर आटोक्यात आणावेत, अशी जोरदार मागणी कोपरगावकरांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!