मुंबई -मंगेश म्हात्रे
आज अचानक हजारो नागरिकांच्या मोबाईलवर “Extremely Severe Alert” असा संदेश झळकताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांतच सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला—हा कोणता धोका? काही मोठी आपत्ती येतेय का?
पण या गोंधळामागचं खरं कारण वेगळंच आहे…
भारत सरकारने देशभरात नवीन ‘Cell Broadcast’ आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी सुरू केली आहे. हा अलर्ट कोणत्याही आपत्तीचा इशारा नसून, फक्त टेस्ट मेसेज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही.
तथापि, या अचानक आलेल्या अलर्टमुळे अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं. काहींनी याला सायबर हल्ला समजलं, तर काहींना भूकंप किंवा युद्धाचा इशारा वाटला.
भूकंप, पूर यांसारख्या आपत्तींसाठी भारत सज्ज! ‘सेल ब्रॉडकास्ट’ प्रणालीची चाचणी
हा केवळ चाचणी संदेश होता. याच ‘सेल ब्रॉडकास्ट’ प्रणालीद्वारे भविष्यात भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या मोठ्या संकटांबाबत नागरिकांना सेकंदात माहिती मिळणार आहे!


















