Homeताज्या बातम्या'त्या' ११ अर्जदारांची अंतिम सुनावणी २१ मार्चला..

‘त्या’ ११ अर्जदारांची अंतिम सुनावणी २१ मार्चला..

‘त्या’ ११ अर्जदारांची अंतिम सुनावणी २१ मार्चला..

मुंबई, दि. १३ मार्च ( प्रतिनिधी )

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या वतीने संक्रमण गाळे वाटपासाठी ११ अर्जदारांची पात्रता निश्चित करून गाळे वाटप करण्यासाठी पात्रता निश्चित करण्याच्या प्रक्रियेस अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या तटस्थ समितीने ६ मार्च २०२५ रोजी दुसरी सुनावणी आयोजित केली होती. मात्र, या सुनावणीला केवळ दोन अर्जदार अपूर्ण पुराव्यासह हजर राहिल्याने समितीने ११ अर्जदारांना अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात २१ मार्च २०२५ रोजी तिसरी आणि अंतिम सुनावणी होणार असून, अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

२७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीला एकही अर्जदार हजर राहिला नव्हता. अर्जदारांना सुनावणीबाबत सूचित करण्यासाठी मंडळाने नोंदणीकृत पोस्टाद्वारे सूचना पत्रे पाठवली होती. मात्र, अर्जदारांनी सादर केलेल्या अपूर्ण पत्त्यांमुळे पत्रे पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे समितीने कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्जदारांच्या राहत्या पत्त्यावर सूचना पत्रे प्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्जदार उपलब्ध झाले नाहीत. अखेर, समितीने वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून अर्जदारांना सुनावणीबाबत माहिती दिली.
दुसरी सुनावणी ६ मार्च २०२५ रोजी पार पडली. यावेळी केवळ दोन अर्जदार वर्षा मिठबावकर आणि मान गुलाब सिंह हजर राहिले. मात्र, त्यांनी पात्रतेसंबंधी कोणतेही कागदपत्रे समितीकडे सादर केले नाही.

संबंधित अर्जदारांची ओळख पटवणे आणि त्यांच्याद्वारे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान होणे आवश्यक आहे. त्यामुळे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार, उपमुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली गठीत त्रिसदस्यीय समितीने अर्जदारांना अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तिसऱ्या सुनावणीत अर्जदारांनी आपली उपस्थिती लावून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे समितीने स्पष्ट केले आहे. या सुनावणीनंतर समिती पात्रता निश्चित करून संक्रमण गाळे वाटपासंबंधीचा अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच गाळे वाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्या ११ अर्जदारांना ही अंतिम संधी असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!