Homeताज्या बातम्याधारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली

धारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली

धारावीकरांच्या आंदोलनापुढे महापालिका झुकली

महापालिकेने अदानीसाठी घेतलेला निर्णय केला रद्द

मुंबई दि.४ मार्च ( प्रतिनिधी )

धारावीतील म्युनिसिपल चाळी आणि इमारतींच्या हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात महापालिकेने अदानीसाठी घेतलेल्या निर्णयाचा तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर मनपाला हे पत्रक रद्द करावे लागले आहे. यामुळे धारावीकरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील सर्व जमिनी आणि त्यावरील बांधकामे डीआरपीच्या माध्यमातून अदानीकडे सोपवण्याचा निर्णय पालिकेच्या जी / उत्तर विभागाने घेतला होता. याबाबत ६ फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते. या निर्णयामुळे माटुंगा लेबर कॅम्प, शाहू नगर आणि अशा इतर म्युनिसिपल चाळी व इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या खोलीच्या हस्तांतरणासाठी डीआरपीकडे जावे लागणार होते. यापूर्वी झालेली हस्तांतरण प्रकरणे पूर्ववत करण्याच्या या निर्णयामुळे धारावीतील रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

या विषयी धारावी बचाव आंदोलनाने या निर्णयाचा तीव्र विरोध केला. “धारावीकरांना अदानीकडे शरणागत करण्याचा निंदनीय प्रकार” असे संबोधीत धारावीकरांनी जन आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक मनपा आयुक्त (जी/उत्तर विभाग) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हे अन्यायकारक पत्रक त्वरित मागे घेण्याची मागणी करत, हजारो धारावीकरांनी दादर येथील मनपा कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती.

या तीव्र आंदोलनाची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत, संबंधित पत्रक रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. अशी माहिती “बहुजन शक्ती” न्यूज पोर्टला धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेन्द्र कोरडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!