Homeताज्या बातम्याम्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळात समाजकल्याण केंद्र कागदावरच गायब

म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळात समाजकल्याण केंद्र कागदावरच गायब

आरटीआयमुळे भांडाफोड

मुंबई, दि.२३ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, समाजकल्याणाच्या नावाखाली सुरू असलेला गोंधळ माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. माजी स्थानिक राज्यसभा खासदार यांच्या निधीतून उभारण्यात आल्याचा दावा असलेल्या वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमधील नागरी आरोग्य केंद्रासमोरील समाजकल्याण केंद्राबाबत माहिती मागविण्यात आली असता, संबंधित कामाची कोणतीही अधिकृत नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

माहिती अधिकार अधिनियमांतर्गत आनंद कांबळे यांनी या समाजकल्याण केंद्राच्या कामासंदर्भात सविस्तर माहिती मागवली होती. यानंतर कांबळे यांनी प्रत्यक्ष म्हाडा कार्यालयात भेट दिली असता, झोपडपट्टी सुधार मंडळाचे कनिष्ठ अभियंता उगले डी. बी. यांनी खासदार निधीतून करण्यात आलेल्या सर्व कामांची यादी दाखवली. मात्र त्या यादीत समाजकल्याण केंद्राचा कुठेही उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मागितलेली माहिती देणे शक्य नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी हात वर केले.

सार्वजनिक निधीतून काम झाल्याचा दावा केला जात असताना त्याची नोंदच उपलब्ध नसणे, हा प्रकार गंभीर मानला जात आहे. समाजकल्याणासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत, असा सवाल आनंद कांबळे यांनी उपस्थित केला आहे. पारदर्शकतेसाठी असलेल्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारणा होऊनही संबंधित विभागाकडे माहितीच नसणे, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

दरम्यान, माहिती न दिल्यास प्रथम अपील करण्याचा सल्ला देत म्हाडाने कांबळे यांना पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास सांगितले आहे. झोपडपट्टीतील नागरिकांच्या विकासासाठी जबाबदारी असलेल्या मंडळाकडूनच अशी बेजबाबदार भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळात नेमके काय सुरू आहे, समाजकल्याणाच्या नावाखाली मंजूर निधीचा वापर कुठे झाला, की तो मुद्दाम लपवण्यात आला, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आनंद कांबळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!