पैठण,दि.२६.(अभिजीत सोनवणे )
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महाराज यांच्या पावन भूमीवर, वीरभद्रा नदीच्या तीरावर वसलेले श्री क्षेत्र रेणुकादेवीचे तीर्थक्षेत्र — नांदर — हे गाव अनेक मान्यवर व्यक्तींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. शिक्षण, समाजकारण, सामाजिक कार्य, तसेच विविध क्षेत्रांत गावातील व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले आहे.
या गौरवशाली परंपरेला पुढे नेत “साक्षी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, नांदर” यांच्या वतीने “अभिमान गावाचा, सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचा” हा भव्य गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. संदीप पा. भुमरे (खासदार, छत्रपती संभाजीनगर) व मा. श्री. रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर), मा. श्री. अविनाश लोंढे (उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर), मा. सौ. ज्योती पवार (तहसीलदार, पैठण), मा. श्री. एन. डी. कुलकर्णी (शल्य चिकित्सक) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रवींद्र काळे, मा. श्री. सुनील पाटील, मा. श्री. सचिन पंडित, आणि मा. प्रा. संतोष तांबे हे मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नांदरच्या ८० युवक व युवतींचाही सन्मानचिन्ह, व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला गावकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.मा. प्रा. संतोष तांबे, प्रा.संदीप काळे, विजय औटे, संरपंच विजय गायकवाड, उपसंरपंच आसमान दादा काळे,माजी उपसंरपंच रेवणनाथ कर्डीले, सदस्य शिवाजी मगरे, प्रविण काळे,कचरु नाचन, दावरवाडी चे सरपंच ॲड डी.डी जाधव,शाम तांगडे, राजेंद्र वाघमोडे,कमलाकर एडके, बबन तुपे, यशवंत काळे, किशोर वैद्य, शिवाजी शिंदे, परमेश्वर शिंदे, प्रविण राऊत,अरविंद मिसाळ, अभिषेक जावळे, राहुल काळे,व गावातील युवक,महीला ज्येष्ठ नागरीक,आदी मान्यवर उपस्थित होते.




















