Homeताज्या बातम्याअवघ्या महिनाभरात उखडला रस्ता; पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुष्की

अवघ्या महिनाभरात उखडला रस्ता; पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुष्की

सायन – सरदारनगर रस्त्याच्या निकृष्ट कामावर मनसेचा संतप्त सवाल

मुंबई, दि.१० : मंगेश म्हात्रे

सायन- सरदारनगर येथील जयशंकर याज्ञीक मार्गाच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला जाब विचारला आहे. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणानंतर अवघ्या महिन्याभरातच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले त्यामुळे पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामावर मनसेने प्रश्न उपस्थित केला आहे.

सरदारनगर आणि प्रतीक्षानगरला जोडणारा जयशंकर याज्ञीक मार्ग हा परिसरातील मुख्य मार्ग आहे. पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होऊन चाळण झाली होती. दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली होती. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर महिनाभरापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते मात्र महिन्याभराच्या आतचं रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले परिणामी पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. मनसे विभागाध्यक्ष संजय भोगले यांनी आरोप केला की, “डांबरीकरणाच्या नावाखाली ठेकेदार आणि प्रशासनाने जनतेला चुना लावला आहे. निधी खर्च करूनही रस्त्यांची अशी अवस्था असणे हे भ्रष्टाचाराचे द्योतक आहे.”

मनसे उपविभाग अध्यक्ष विलास अपराध यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “रस्त्यांचा दर्जा सुधारणा करण्यात यावी, पुन्हा खड्डे पडल्यास सरदारनगर आणि प्रतीक्षानगरमधील नागरिकांना सोबत घेऊन ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन छेडले जाईल.”

प्रशासनाने या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी असे मनसे शाखाध्यक्ष लवू यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!