कोपरगाव, दि. २६ : दिपक साटोटे
शिर्डी विभागीय अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज कोपरगाव तालुका तहसील कार्यालयास भेट दिली. या वेळी तहसीलदार महेश सांवत यांच्यासह तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी शासकीय कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषत: जीवंत सातबारा, वारस नोंदी व इतर शासकीय विषयांच्या प्रक्रियेतील गती व पारदर्शकता यावर भर देण्यात आला. तसेच नागरिकांना अधिक सुलभ व वेळेवर सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने दक्ष राहावे, असेही त्यांनी सूचित केले.
या बैठकीत तालुका पातळीवरील प्रलंबित कामांची पाहणी करून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानिमित्ताने झालेल्या या भेटीमुळे शासकीय यंत्रणेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




















