Homeताज्या बातम्याकोपरगावच्या विद्यार्थ्यांचा शिर्डी विमानतळावर शैक्षणिक अभ्यास दौरा..

कोपरगावच्या विद्यार्थ्यांचा शिर्डी विमानतळावर शैक्षणिक अभ्यास दौरा..

विमानाचे टेक-ऑफ-लँडिंग पाहत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला विमानतळ व्यवस्थापनाचा धडा…

कोपरगाव,दि.११.( दिलीप गायकवाड )

पुस्तकात विमानांची चित्रे पाहणाऱ्या कोपरगावच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात विमानाचे टेक-ऑफ आणि लँडिंग पाहत ‘विमानाचे उड्डाण’ अनुभवले. येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शिर्डी (काकडी) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शैक्षणिक भेट दिली. विमानतळ प्राधिकरणाने विशेष परवानगी देत विद्यार्थ्यांना विमानतळाच्या अंतर्गत कामकाजाची माहिती दिली.

संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या संकल्पनेतून हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या भेटीदरम्यान विमानतळावरील विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आली.

प्रवाशांचे तिकीट तपासणी व बोर्डिंग पास प्रक्रिया, बॅगेज तपासणीसाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्रणा, तसेच अरायव्हल व डिपार्चर विभागाचे नियोजन कसे केले जाते याबाबत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी धावपट्टी (रनवे) हे विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. विमानाचे लँडिंग आणि टेक-ऑफ जवळून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीचे व्यवस्थापन व विमानांच्या सिग्नल यंत्रणेचे कार्य समजावून सांगितले.

दरम्यान, सीआयएसएफच्या जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विमानतळ सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. देशाच्या सुरक्षेत सुरक्षा दलांची भूमिका, शिस्त आणि कर्तव्यभावना याबाबत दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

तसेच एव्हिएशन क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वैमानिक, एअर होस्टेस, एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांसारख्या क्षेत्रात कसे प्रवेश करता येतो याबाबत माहिती देण्यात आली.

या अभ्यास दौऱ्याबद्दल संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी झावरे पाटील, कार्यकारी संचालक विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!