Homeताज्या बातम्याकोपरगावात ' तांडेल बंगला ' शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

कोपरगावात ‘ तांडेल बंगला ‘ शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

कोपरगाव,दि.११.दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठी असलेले शासकीय विश्रामगृह अर्थात तांडेल बंगला सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याने तो विश्रामगृह राहिला की भूत बंगला झाला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी या शासकीय विश्रामगृहाच्या दुरवस्थेबाबत लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तालुक्यातील अनेक जागरूक नागरिकांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत या प्रश्नाला वाचा फोडल्याचे सांगितले.

गोदावरी नदीच्या निसर्गरम्य काठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने उभारण्यात आलेला तांडेल बंगला एकेकाळी राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रसिद्ध होता. या ठिकाणी अनेक बैठका आणि चर्चांमधून जनतेच्या समस्या थेट वरिष्ठ पातळीवर पोहोचत असत. येथून अनेक प्रश्न राज्याच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये — विधानसभा आणि विधान परिषदेत — मांडले गेले होते.

मात्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खर्च करूनही या विश्रामगृहाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या बंगल्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत असून, विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी ही बाब लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

तांडेल बंगला योग्य प्रकारे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवला तर शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहाला तो उत्तम पर्याय ठरू शकतो. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था येथे होऊ शकते. मात्र तसे होऊ नये यासाठीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीवर खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे कोणतेही काम दिसून येत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तांडेल बंगला भूत बंगला होण्यास नेमके कोण जबाबदार, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

*अँड. नितीन पोळ यांची मागणी :*

तांडेल बंगला तातडीने दुरुस्त करून तो सर्व सुविधांसह पुन्हा सुरू करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाच्या देखभाल-दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल जाहीर करावा. तसेच कोपरगाव शहर व परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने तांडेल बंगल्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड. नितीन पोळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!