Homeताज्या बातम्याअमेरिका–भारत शेतीमाल करार रद्द करा; 

अमेरिका–भारत शेतीमाल करार रद्द करा; 

कोपरगाव बाजार समितीचे ऑडिट करा;काँग्रेस, विजय जाधव. कोपरगांव यांची मागणी

कोपरगाव : दि. ११.चंद्रकांत जोर्वेकर ,

भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारा अमेरिका–भारत शेतीमाल आयात-निर्यात करार तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन २०१५ ते २०२६ या कालावधीतील सर्व व्यवहारांचे सरकारी ऑडिट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया किसान काँग्रेस आहिल्यानगर जिल्ह्य उपाध्यक्ष, विजय जाधव कोपरगांव यांनी राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विजय जाधव, यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे पाठविलेल्या निवेदनात हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के आयात कर असून भारतीय शेतीमालावर मात्र मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असल्याने भारतीय शेतकऱ्यांवर आर्थिक अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान मिळत असल्याने त्यांचा कांदा, मका, सोयाबीन, कापूस, दूध आदी शेतीमाल भारतात स्वस्त दरात येऊ शकतो. यामुळे भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसण्याची शक्यता असून देशातील मका, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. तसेच दुग्ध व्यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, कांद्यास हमीभाव जाहीर करणे, सर्व शेतीमालाला कायदेशीर हमीभाव देणे, आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करणे तसेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे २०१५ पासून आतापर्यंतचे सर्व व्यवहार शासनाच्या नियमांनुसार तपासून ऑडिट करावे, अशा मागण्या देखील निवेदनात करण्यात आल्या आहेत.

सरकारने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!