Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजीनगर येथील "५३ अनिवासी भूखंडांसाठी " म्हाडाचा ई-लिलाव; २ जूनपासून नोंदणी...

छत्रपती संभाजीनगर येथील “५३ अनिवासी भूखंडांसाठी ” म्हाडाचा ई-लिलाव; २ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. ३० मे २०२५ : छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मंडळामार्फत ५३ अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव जाहीर करण्यात आला असून, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रिया २ जून २०२५ पासून सुरू होणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी ही माहिती दिली.

ई-लिलाव प्रक्रिया ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर पार पडणार आहे. लिलावाचा एकत्रित निकाल ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (https://mhada.gov.in व www.eauction.mhada.gov.in) जाहीर केला जाईल.

अर्जदारांना ई-लिलावात सहभागी होण्यासाठी २ जून ते १ जुलै दरम्यान नोंदणी, ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रांची अपलोडिंग व अनामत रकमेचे भरणे करता येणार आहे. अनामत रकमेचा भरणा आरटीजीएस व एनईएफटीद्वारे २ जुलै २०२५ पर्यंत करता येईल.

ई-लिलावाची सविस्तर माहिती, पात्रता निकष, भूखंड तपशील, अटी व शर्ती, अर्ज प्रक्रिया व माहिती पुस्तिका www.eauction.mhada.gov.in व mhada.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. कोणत्याही मुद्रणदोषाचा लाभ अर्जदाराला मिळणार नाही, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!