Homeताज्या बातम्याम्हाडाच्या मुंबईतील २६४० घरांची सोडत जाहीर

म्हाडाच्या मुंबईतील २६४० घरांची सोडत जाहीर

मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाकडून मुंबईतील तब्बल २६४० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून, या प्रक्रियेला ३० मार्च २०२६ पासून अधिकृत सुरुवात होणार आहे. विविध उत्पन्न गटांसाठी उपलब्ध असलेल्या या सदनिकांमुळे हजारो मुंबईकरांना परवडणाऱ्या घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सोमवारी ३० मार्च, २०२६ रोजी ‘गो लाईव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ०३.०० वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २९ एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०५ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक १२ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक ०८ मे, २०२६ रोजी सकाळी ११. ०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी दि. १२ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १५ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सोडत काढली जाणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे नंतर जाहीर केले जाईल.

मुंबई मंडळाच्या २०२६ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या १७६२ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ सदनिका तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या ३१९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका ‘जशा आहे त्या स्थितीमध्ये’ विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!