Homeताज्या बातम्यासेक्टर १ मधील चाळी इमारतींच्या सर्वेक्षणाकडे डीआरपीची पाठ....

सेक्टर १ मधील चाळी इमारतींच्या सर्वेक्षणाकडे डीआरपीची पाठ….

चाळींच्या पोट माळ्यावर राहणार्‍यांना मोफत घर देण्याची मागणी : रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र….

मुंबई, दि.१२ : मंगेश म्हात्रे

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (डीआरपी) पूर्वीच्या सेक्टर १ मधील चाळी व इमारतींच्या सर्वेक्षणाकडे डीआरपी प्रशासनाने पाठ फिरवली आहे. सर्वेक्षण करण्यास रहिवाशांचा विरोध नसतानाही डीआरपीने येथील घरांचे सर्वेक्षण केलेले नाही. सेक्टर १ मधील चाळी इमारतींमधील घरांचे सर्वेक्षण करून चाळींमधील पोटमाळ्यावर राहणार्‍या कुटुंबांना मोफत घर देण्याची मागणी डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघ या संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी) मार्फत अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट (एनएमडीपीएल) या कंपनीची निवड केली आहे. डीआरपी आणि एनएमडीपीएल संयुक्तपणे हा प्रकल्प राबवत आहे. कंपनीमार्फत धारावीतील झोपड्यांची घरोघरी जाऊन पात्रता सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत होती. या दरम्यान सेक्टर १ मधील काही झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर काही झोपड्या, दुकानांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे चाळी आणि इमारतींमध्ये घरांचेही सर्वेक्षण केलेले नाही. अशातच डीआरपीने घरोघरी जाऊन होणार्‍या सर्वेक्षणाला १२ ऑगस्ट रोजी पूर्णविराम दिला आहे.

यामुळे सेक्टर १ मधील रहिवाशी संतप्त झाले आहेत.

धारावी प्रकल्पातील मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या जमीनीवरील चाळी व इमारतींचे सर्वेक्षण करण्यास रहिवाशांचा विरोध नसताना सर्वेक्षण केले नाही. त्यामुळे चाळी इमारतींनामधील घरांचे तातडीने सर्वेक्षण करावे अशी मागणी डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघाने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यावर किवा पोटमाळ्यावर राहणार्‍या कुटुंबीयांना घरे देण्यात येत आहेत. मात्र सेक्टर १ मधील चाळींच्या पोट माळ्यावर राहणार्‍या कुटुंबीयांना घर नाकरण्यात येत आहे. हा सेक्टर १ मधील रहिवाशांवर अन्याय आहे.चाळीमधील पोटमाळ्यावर वास्तव्यास असणार्‍या कुटुंबांनाही हक्काचे मोफत घर द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली असल्याचे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघाचे निमंत्रक आशिष मोरे यांनी सांगितले.

———————-

चाळी इमारतीमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर द्या…

धारावीतील झोपडीधारकांना घर देण्यात येत आहे. मात्र सेक्टर १ मधील जुन्या चाळी आणि इमारतीमधील रहिवाशांना ४०५ चौरस फुटाचे घर देऊन अन्याय करण्यात येत आहे. चाळी इमारतीमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी संघांचे निमंत्रक अनिल भंडारे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!