Homeताज्या बातम्यास्वतः चा जीव धोक्यात घालून साप पकडला; महीलेला दंश, वेळेत उपचार मिळाल्याने...

स्वतः चा जीव धोक्यात घालून साप पकडला; महीलेला दंश, वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

नांदर (ता. पैठण) येथील घटना; आशा लक्ष्मण धरम या सेविकेच्या तत्परतेमुळे महीला वेळेत रुग्णालयात दाखल.

दावरवाडी, दि.२९.( अभिजीत सोनवणे )

पैठण तालुक्यातील नांदर ता. पैठण (शिवाजीनगर) येथील हुदाबी जावेद पठाण (वय _३३__) ह्या नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता घरातील काम करत असताना त्यांना एक साप दिसला. तो साप कोंबड्यांच्या अंड्यांकडे जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आपल्या हाताला ओढणी बांधून साप पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सापाने त्यांच्या हाताला दंश केला.

दंश झाल्यानंतरही त्यांनी ही बाब कोणालाही न सांगता आपले काम सुरू ठेवले. दरम्यान, सकाळी ११वाजता नियमित आरोग्य तपासणीसाठी त्यांच्या घरी आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा धरम सेविकेला त्यांनी ही घटना सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आशा लक्ष्मण धरम या सेविकेने त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ राणी मुगदल, श्रीमती राऊत, श्रीमती जाधव, यांनी त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले.

मात्र, त्यावेळी रुग्णवाहीका पेंशट घेऊन गेली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांना तिथुन खाजगी वाहनाने त्यांना पुढील उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ संदीपान काळे यांनी वेळेत उपचार करुन त्यांना शुध्दीवरती आणले. त्यांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया (वैद्यकीय अधिकारी डॉ राणी मुगदल )- आपल्या नांदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही अगोदरच एक पेंशट घेऊन गेली होती. त्यामुळे येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आम्ही त्यांना खाजगी वाहनाने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!