Homeताज्या बातम्याकोकमठाणातील ऐतिहासिक बारव दुर्वस्थेत – जतनाची मागणी तीव्र..

कोकमठाणातील ऐतिहासिक बारव दुर्वस्थेत – जतनाची मागणी तीव्र..

जय मल्हार संघर्ष समितीचा आवाज; सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ नेहे यांची प्रशासनाला मागणी

कोपरगाव, दि. ७: (दिलीप गायकवाड)

तालुक्यातील कोकमठाण हद्दीत समृद्धी महामार्गाजवळील शिर्डी बायपास, नगर-मनमाड महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले ऐतिहासिक बारव आज अत्यंत दुर्वस्थेत असून, या वास्तूच्या जतनाची मागणी तीव्र झाली आहे.

जय मल्हार संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ नेहे यांनी या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधत, “ही बारव म्हणजे होळकरकालीन ऐतिहासिक वारसा असून, तिचे तातडीने जीर्णोद्धार करण्यात यावा,” अशी मागणी केली आहे. नेहे यांनी सांगितले की, कोकमठाण ग्रामपंचायतीकडून या बारवात सांडपाणी सोडले जात असून, त्यामुळे या वास्तूचा अवमान होत आहे. हे सांडपाणी सोडणे तात्काळ थांबविण्यात यावे, अशीही त्यांनी मागणी केली.

इतिहासाची साक्ष देणाऱ्या या परिसरात होळकर काळात अनेक बांधकामे करण्यात आली होती. हेमाडपंती शैलीतील मंदिराला अहिल्याबाईंनी ३२ पायर्या दिल्या होत्या, तसेच अनेक विहिरी व बारवा बांधण्यात आले. जुना बेलापूर रस्ता हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता, परंतु सध्या तोही बंद अवस्थेत आहे.

गोकुळभाऊ नेहे यांनी पुढे सांगितले की, “या ऐतिहासिक बारवाचे संवर्धन करून त्याला वारसा स्थळ म्हणून घोषित करावे. तसेच समृद्धी महामार्गाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

error: Content is protected !!