Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ व १४ एप्रिलला ‘टूर सर्कीट’ सहल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ व १४ एप्रिलला ‘टूर सर्कीट’ सहल

पर्यटन विभागाचा उपक्रम; मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये निःशुल्क सहल

मुंबई : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या पर्यटन विभागामार्फत १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे आयोजित करण्यात येणारी ही सहल पर्यटक, नागरिक, विद्यार्थी तसेच अनुयायांसाठी निःशुल्क ठेवण्यात आली असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, जीवनचरित्र आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले. बाबासाहेबांच्या स्मृतींनी पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणे हा केवळ प्रवास नसून त्यांच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे देसाई यांनी सांगितले.

महत्त्वाच्या स्थळांना भेट

या टूर सर्कीटमध्ये मुंबईतील चैत्यभूमी (दादर), राजगृह, बाबासाहेबांचे प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी. चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय तसेच फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर येथे भेट दिली जाणार आहे.

तर नागपूरमध्ये दीक्षाभूमी, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस या स्थळांचा समावेश आहे.

१३ एप्रिलला उद्घाटन

या टूर सर्कीट सहलीचे औपचारिक उद्घाटन १३ एप्रिल रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सहलीला सकाळी १० वाजता सुरुवात होईल. मुंबईतील सहलीची सुरुवात चैत्यभूमी, दादर येथून, नाशिकमध्ये गडकरी चौक आणि नागपूरमध्ये दीक्षाभूमी येथून होणार आहे.

निःशुल्क बस व मार्गदर्शकाची सुविधा

या उपक्रमांतर्गत दररोज विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी पर्यटकांसाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार व पिण्याचे पाणी आदी सुविधा पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले की, चैत्यभूमी, मुक्तीभूमी आणि दीक्षाभूमी ही स्थळे केवळ धार्मिक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. या टूर सर्कीटच्या माध्यमातून समतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

सहलीची वैशिष्ट्ये

आयोजनाची ठिकाणे : मुंबई, नाशिक, नागपूर

कालावधी : १३ व १४ एप्रिल २०२६

सुविधा : प्रत्येक शहरात विशेष बसेस, टूर मार्गदर्शक, अल्पोपहार व पिण्याचे पाणी

संपर्क

मुंबई : पवन पवार – ७६६६६०३२११, सूरज चतुर्वैदी – ८१०८१७५५३०

नाशिक : तुषार शिंदे – ९८९०२५५१५७, ऋषिकेश चव्हाण – ८८०६८४१४६८

नागपूर : अविनाश गजघाटे – ९८२३१११२०३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!