Homeताज्या बातम्याबिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – साईनाथ खरात 

बिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – साईनाथ खरात 

ठाणे,दि.३.( प्रतिनिधी )

लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या बिनविरोध विजयी उमेदवारीच्या वाढत्या प्रवृत्तीवर आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ खरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने बिनविरोध विजयी उमेदवार निवडून येणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

लोकशाही ही लोकांची, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारी शासनपद्धती आहे. मात्र आज अनेक ठिकाणी निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असून, स्पर्धा, मतदान आणि जनतेचा थेट सहभागच नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने मतदारांचा निवड करण्याचा अधिकार हिरावला जात आहे, असे साईनाथ खरात म्हणाले.

“बिनविरोध निवड कायद्याने चुकीची नसली, तरी ती सातत्याने होत राहिली तर लोकशाही कमकुवत होते. कारण जनतेचा आवाज मतदान पेटीत पोहोचतच नाही,” असे ते म्हणाले. काही ठिकाणी राजकीय दबाव, दडपशाही आणि भीतीचे वातावरण निर्माण करून विरोधी उमेदवार उभे राहू दिले जात नसल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केले.

लोकशाहीमध्ये मतदार जितका जागरूक असणे आवश्यक आहे, तितकेच महत्त्व निवडणूक लढवण्याच्या स्वातंत्र्याला आहे. “जर स्पर्धाच नसेल, तर विकासाचा जाब कोण विचारणार? लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा हिशोब कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुका खर्‍या अर्थाने स्पर्धात्मक व्हायला हव्यात, मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करताना साईनाथ खरात म्हणाले, “मतदान नसेल तर लोकशाही फक्त कागदावर उरेल.”

हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण व्यवस्थेचा आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक मतदाराने आपला हक्क ओळखून निर्भयपणे तो वापरणे गरजेचे आहे, असे आवाहन खरात यांनी शेवटी बोलत असताना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

एमएमआरडीए’कडून मान्सूनपूर्व तयारीला वेग;

मेट्रो मार्गांवरील १.१४ लाख मीटर बॅरिकेड्स हटविले मुंबई : अजय मगरे पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी एमएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

error: Content is protected !!