भांडुप,दि.९.( अजय मगरे )
आर. के. विधी महाविद्यालयातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापिका दीप्ती मेस्त्री यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी स्त्रीच्या विविध भूमिका मांडताना आजच्या काळात स्त्रिया समाजातील अनेक क्षेत्रांत महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असल्याचे विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थी संतोष बांगर, वैभव सैद, डॉ.संदीप माने आणि सुनील दोलताडे यांनी स्त्री जीवनाविषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच डॉ.संदीप माने यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सुंदर कविता सादर केली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री सन्मान व समानतेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.




















