Homeताज्या बातम्याइंदू मिल स्मारक कामाला गती; डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार - मंत्री...

इंदू मिल स्मारक कामाला गती; डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. ७ : अजय मगरे

भारताचे संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला समर्पित दादर येथील इंदू मिलमधील भव्य स्मारक आणि पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतला. या बैठकीस आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री शिरसाट म्हणाले, “समुद्रकिनाऱ्यालगत उभारले जाणारे हे स्मारक डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे भव्य प्रतीक ठरणार आहे. पुतळा उभारणीसंबंधी शिल्पकार राम सुतार यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून त्या संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष देत काम कालबद्ध पद्धतीने सुरू आहे.”

मंत्री शिरसाट यांनी पुढे सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून सर्व विभागांना त्या दृष्टीने नियोजनबद्धपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

या बैठकीत स्मारक परिसरातील सुविधा, प्रवेशद्वार, सभागृह, संग्रहालय आणि पुतळ्याच्या उंचीबाबतही चर्चा झाली. लवकरच उभारणीच्या पुढील टप्प्यांवर काम सुरू होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!