Homeताज्या बातम्याकोपरगाव गटार योजना प्रकल्पाच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

कोपरगाव गटार योजना प्रकल्पाच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

कोपरगाव,दि.६. ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी पायाभूत सुविधा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना प्रकल्पातील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुमारे २२७ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मे. मंगळिया ब्रदर्स प्रोजेक्ट अँड जयंती सुपर (जेनी), गुजरात या कंपनीकडून राबविला जात आहे.

या प्रकल्पातील कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी, तांत्रिक दोष व निष्काळजीपणा असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याबाबत यापूर्वीही नगर परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, दि. २० जानेवारी २०२६ रोजी पुकारलेल्या आमरण उपोषणावेळी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, प्रकल्प सल्लागार व ठेकेदार यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप विनय भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

आमरण उपोषण मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भगत यांनी निवेदनाद्वारे दिला असून, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, कोपरगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना प्रकल्पातील कथित निकृष्ट कामाच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.

या बैठकीत प्रकल्पाच्या कामाचा दर्जा, नागरिकांकडून प्राप्त तक्रारी तसेच पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी कामातील त्रुटी, गैरप्रकार, तसेच प्रशासन व ठेकेदारांकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबाबत आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत असून, नागरिकांना योग्य न्याय दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!