Homeताज्या बातम्याकोपरगाव तहसील कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे ' बिऱ्हाड ' आंदोलन सुरू

कोपरगाव तहसील कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे ‘ बिऱ्हाड ‘ आंदोलन सुरू

कोपरगाव दि.१८ ( दिलीप गायकवाड

कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील मैदानात एकलव्य संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचे बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. संघटनेचे कोपरगाव कार्याध्यक्ष निलेश ठाकरे आणि तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आदिवासी कुटुंबे, महिला आणि लहान मुले रखरखत्या उन्हात बसून आंदोलन करत आहेत. तहसील कार्यालयासमोर चूल मांडून स्वयंपाक करत आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून राहत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत नोटीसा पाठवून घरे हटवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही येथे अनेक वर्षे वास्तव्यास आहोत, त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी रवंदे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि कोपरगाव गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जोपर्यंत पर्यायी जागा देऊन पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा निलेश ठाकरे आणि उत्तम पवार यांनी दिला आहे.

यासंदर्भात कोपरगाव तहसील अधिकारी जिल्हा कार्यालयात गेल्याचे नायब तहसीलदार सातपुते यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, सदर प्रकरण बीडीओ कार्यालयाशी संबंधित असून, लवकरच बैठक घेऊन तहसील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. मात्र, तातडीने पुनर्वसन करणे शक्य नसल्याने सध्या आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर त्वरित निर्णय होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!