कोपरगाव,दि.२.चंद्रकांत जोर्वेकर
कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान मंदिरात श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. मठाधीश प.पू. रमेशगिरी महाराज यांच्या उपस्थितीत श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा व धार्मिक विधी करण्यात आले.
धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी मंदिरात उपस्थित राहून श्री हनुमान व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी मठाधीश प.पू. रमेशगिरी महाराज यांनी सद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पूजामूर्तीला पुष्पहार अर्पण करून भक्तांना आशीर्वाद दिला. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना केळी, लाडू व पेडे असा प्रसाद वाटप करण्यात आला.




















