दावरवाडी,दि.२४(अभिजीत सोनवणे)
पैठण तालुक्यातील कौदर ता पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि २४ डिसेंबर बुधवारी आंनदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घरुन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विकण्यासाठी आणले. यावेळी अध्यक्ष विद्या हाकम, उपाध्यक्ष अंजली मोहन राऊत, ऊदयसेन काळे,ग्रामपंचायत सदस्य गणेश बारे, ज्ञानेश्वर वतारी, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बारे, रमेश ठाणगे, बालु राऊत, यशवंत राऊत, गोपाळ राऊत, गणेश कोरडे, बाळासाहेब ठाणगे, महेश बारे, मुख्याध्यापक श्रीकांत कराड, अशोक दुधे, संतोष गायकवाड, नवनाथ जाधव, बिभिषण सुपेकर व आदी मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते..



















