ठाणे, दि.२६ : अजय मगरे
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही गाजावाजा न करता जनतेसाठी भरीव काम केलं असून, ते काम जनता कधीही विसरणार नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी काढले. ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना मदत करताना शिंदे यांनी प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत केलं, हा त्यांचा मोठेपणा असल्याचं महाजन म्हणाले. हिंदुत्वाबाबत जागरूक आणि कडवे हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून शिंदे यांचा उल्लेखही त्यांनी केला.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपमध्ये सन्मानजनक युती होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महाजन यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळकटी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.



















